मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयच्या कॉण्ट्रॅक्ट सिस्टीममधल्या ए प्लस श्रेणीतून वगळण्यात आलं आहे. तर फलंदाज रिषभ पंतला ए श्रेणी स्थान दिलं आहे. बीसीसीआयने गुरुवारी रात्री उशिरा टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली.


धवन आणि भुवनेश्वरसह टीम इंडियाच्या अकरा शिलेदारांचा ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यात धोनी आणि रहाणेचाही समावेश असून, या अकरा जणांना वर्षाला पाच कोटी रुपयांचं मानधन देण्यात येईल.

दुसरीकडे सर्वात वरच्या ए प्लस श्रेणीत तीन खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा या तिघांनी ए प्लस श्रेणीतलं स्थान राखलं आहे. त्या तिघांना ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी सात कोटी रुपये मानधन देण्यात येईल.

ए प्लस श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए श्रेणी : आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम एस धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत

बी श्रेणी : केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या (या श्रेणीमधील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात)

सी श्रेणी : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, रिद्धीमान साहा (या खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये मानधन मिळणार)



महिलांचं कॉण्ट्रॅक्ट

महिलांच्या कॉण्ट्रॅक्टमध्ये ए श्रेणीत चार खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा या यादीत समावेश आहे. महिलांच्या ए श्रेणीत सामील खेळाडूंना वार्षिक 50 लाख रुपये मानधन मिळतं.

सी श्रेणीमध्ये 11 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये राधा यादव, डी. हेमलता, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना मेशराम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूनम वस्त्राकर यांचा समावेश आहे. त्यांना वार्षिक 10 लाख रुपये मानधन मिळेल.

ए श्रेणी : मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव

सी श्रेणी : राधा यादव, डी. हेमलता, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना मेशराम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूनम वस्त्राकर