नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघातल्या एका खेळाडूने आपल्याला मॅचफिक्सिंगच्या उद्देशाने दोन व्यक्तींनी संपर्क साधल्याची तक्रार केली आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातल्या मर्यादित षटकांच्या सामन्याआधी हा प्रकार घडल्याची तक्रारीत नोंद आहे. या प्रकरणात बीसीसीआयच्या अॅन्टी करप्शन युनिटने (एसीयू) राकेश बाफना आणि जीतेंद्र कोठारी यांच्याविरोधात बंगळुरु पोलिसांत एफआयआरची नोंद केली आहे. त्या दोघांविरोधात भारतीय दंडकायद्यातल्या चार कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅन्टी करप्शन युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणारी महिला क्रिकेटपटू भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे आयसीसीने याप्रकरणी चौकशी केली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलीस ठाण्यात राकेश बाफना व जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅचफिक्सिंगचे सावट, महिला क्रिकेटपटूची तक्रार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2019 09:33 PM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघातल्या एका खेळाडूने आपल्याला मॅचफिक्सिंगच्या उद्देशाने दोन व्यक्तींनी संपर्क साधल्याची तक्रार केली आहे.
getty image
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -