मेसी स्पेनच्या बार्सिलोना फुटबॉल क्लबचं प्रतिनिधित्व करतो. 2007 ते 2009 या कालावधीत आपलं उत्पन्न लपवण्यासाठी मेसीनं बेलिझ आणि उरुग्वेमध्ये बेकायदेशीररित्या पैसा गुंतवल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी कोर्टानं मेसीचे वडील आणि व्यवस्थापक जॉर्ज मेसी यांनाही 21 वर्षांच्या तुरुगंवासाची शिक्षा सुनावली आहे.
मेसी आणि त्याच्या वडिलांना कोर्टानं 37 लाख युरोंचा दंडही ठोठावलाय. मात्र दोघांना या शिक्षेतून सूट मिळण्याचीही शक्यता आहे.
'मी केवळ फुटबॉलवरच लक्ष केंद्रित करतो, माझ्या आर्थिक व्यवहारांत लक्ष घालत नाही', असा बचाव मेसीनं केला होता. काही दिवसांपूर्वीच कोपा अमेरिकाची फायनल गमावल्यावर मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली होती.