बॉक्स ऑफिसवर 'सुलतान'ला तुफान प्रतिसाद, शो हाऊसफुल
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 07:30 AM (IST)
मुंबई : ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा बहुचर्चित 'सुलतान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर त्याला जोदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. प्रेक्षकांनी आज रांगेत उभं राहून तिकीट खरेदी केली. सोशल मीडियावरही सुलतानचं भरभरुन कौतुक होतं आहे. सलमान खानचा आतापर्यंतचा सर्वात चांगला चित्रपट अशा प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून येत आहेत. सलमान खान आणि अनुष्का शर्मा यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यात सलमान रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पहिल्याच आठवड्यात सुलतान बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा व्यवसाय करेल, असा अंदाज चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञ वर्तवत आहे. दरम्यान, त्याआधी सलमान आणि निर्मात्यांना झटका बसला आहे. रिलीजच्या एक दिवस आधीच 'सुलतान' इंटरनेटवर लीक झाला आहे.