चितगाव : बांग्लादेशचा फिरकी गोलंदाज नईम हसनने पदार्पणातच विक्रम केला. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. त्यासोबतच नईम पदार्पणात पाच विकेट्स घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.
नईम हसनचं वय 17 वर्ष 355 दिवस इतकं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंस याच्या नावे होता. कमिंसने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत 18 वर्ष 193 दिवस या वयात पाच विकेट्स घेतल्या होत्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशने पहिल्या डावात 324 धावा केल्या होत्या. ज्यात मोमीनूल हकने 120 धावाची शतकी खेळी केली होती. या डावात वेस्ट इंडिजकडून जोमेल वारीकन याने चार गडी बाद केले.
नईमच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर बांग्लादेशने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 246 धावात ऑलआउट केलं. मात्र बांग्लादेशचा संघ मोठी खेळी करु शकला नाही. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बांग्लादेशचा संघाचा डाव 125 धावात आटोपला.
बांग्लादेशच्या युवा गोलंदाजाचा पदार्पणातच विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2018 01:25 PM (IST)
नईम हसनचं वय 17 वर्ष 355 दिवस इतकं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंस याच्या नावे होता. कमिंसने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत 18 वर्ष 193 दिवस या वयात पाच विकेट्स घेतल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -