लखनौ : काशी, अयोध्या सोडा आधी दिल्लीतील जामा मशीद पाडा. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. मशिदीच्या पायऱ्यांखाली देवी-देवतांच्या मूर्ती न निघाल्यास मला फाशी द्या, असा आव्हान त्यांनी दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, सर्वात आधी दिल्लीतील जामा मशीद तोडायला पाहिजे. कारण हिंदू मंदिर तोडून तिथे मशीद बांधण्यात आली आहे. मथुरा, काशी, अयोध्या सोडा जामा मशिद तोडा, अशी घोषणा मी राजकारणात आलो तेव्हाच दिली होती. हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी मुघलांनी भारतातील मंदिरे तोडून तेथे 3000 मशिदी बांधल्या होत्या, असं साक्षी महाराज म्हणाले. तसेच जामा मशिदीच्या पायाऱ्या तोडल्यास त्यातून देवी-देवतांच्या मूर्ती निघतील असा दावा त्यांनी केला. मूर्ती न निघाल्यास मला फासावर लटकवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिल्लीतील जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. या मशिदीचं बांधकाम 1644 ते 1656 च्या दरम्यान मुघल सम्राट शाहजहान याने केला होता. नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांनी राम मंदिराचा मुद्दा तापलेला असताना जामा मशिदीच्या नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
जामा मशीद पाडा, मूर्ती न निघाल्यास फाशी द्या : साक्षी महाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2018 10:40 AM (IST)
मशिदीच्या पायऱ्यांखाली देवी-देवतांच्या मूर्ती न निघाल्यास मला फाशी द्या, असा आव्हान त्यांनी दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -