बांगलादेशचा श्रीलंकेवर थरारक विजय, फायनलमध्ये धडक
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2018 11:00 PM (IST)
रोमहर्षक सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 विकेट्सनी पराभव करत कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली.
कोलंबो : रोमहर्षक सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 विकेट्सनी पराभव करत कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशनं हे आव्हान शेवटच्या षटकात आठ विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. तमिम इक्बाल आणि मेहमुदुल्लानं बांगलादेशच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. तमिमनं 50 धावांची खेळी केली तर मेहमुदुल्लानं अवघ्या 18 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावल्या. त्याआधी कुशल परेरा आणि थिसारा परेराच्या अर्धशतकांनी श्रीलंकेला नऊ बाद 159 धावांची मजल मारुन दिली होती. कुशल परेरानं 61 तर थिसारानं 58 धावांची खेळी केली.