सातारा : जीएसटी आणि नोटाबंदीला कंटाळत असल्याची फेसबुक पोस्ट टाकून एका सराफा व्यापाऱ्याने आत्महत्या केली. कराड शहराजवळ रेल्वेखाली उडी घेऊन राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. राहुल फाळके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. भविष्यात कुटुंबीयांकडे आणि शिवसेनेकडे लक्ष देण्याचंही आवाहन राहुल फाळके यांनी फेसबुक पोस्टमधून केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इतर नेत्यांसारखे थापा मारणारे नाहीत, त्यांना मन आहे, जनतेच्या वेदना समजतात. त्यामुळे शिवसेनेला निवडून द्या, असं आवाहन राहुल फाळकेंनी केलं. राहुल फाळके यांचं कराडमधील अहुजा चौकात सराफा दुकान आहे. त्यांचं लग्न झालेलं असून दीड वर्षांची मुलगी आहे. कराडजवळील वनवास माची हे त्यांचं गाव आहे. राहुल फाळकेंची फेसबुक पोस्ट सर्वांना माझा शेवटचा नमस्कार  🙏🏻जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली .... तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून GST लागू केला.त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला.आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकलेखूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केलीखूप जणांना अडचणीतून बाहेर आणलेपण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केलाबाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार 1 शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाहीमला कोणाला हि फसवायच नव्हतंमाझा तसा स्वभाव हि नाहीपण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे.आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नयेआणि कोणावर हि कोणतीही कारवाई करू नयेमाझ जीवन उध्वस्त झालंयमला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचंAlwaida ...... 🖖🏻घरातील सर्वांसह .... माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप miss करेनतुमचाराहुलआणि सर्वात महत्वाचं ...... यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या 🙏🏻कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत पणश्री उद्धव ठाकरे यांना मन आहेते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराषष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेलआणि माझी फक्त 1 च विनंती आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावीहि तुमच्या एका शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻