या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे.
या प्रकरणी मैदानातल्या पंचांकडून अहवाल घेऊन सामनाधिकाऱ्यांकडून बंदीची कारवाई अपेक्षित आहे.
दरम्यान, पंचांच्या हा सगळा प्रकार लक्षात येण्याच्या अगोदरच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फफ डू प्लेसिसच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये टीव्हीवर हे पाहताच सहकारी खेळाडूंना याबाबत माहिती दिली.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही या प्रकाराचा फोटो ट्वीट केला. डेल स्टेन सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.
हा प्रकार लक्षात येऊन आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आक्षेप घेऊनही पंचांनी नवा चेंडू मागवला नाही. या प्रकरणी बॅनक्राफ्ट दोषी आढळल्यास त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.