नवी दिल्ली : टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजासह 19 जणांची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर पैलवान बजरंग पुनियासह पॅरा अॅथलीट दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या समितीकडून नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांसाठी निकषांनुसार पात्र खेळाडूच्या वर्षभरातल्या सर्वोत्तम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गेल्या चार वर्षातल्या कामगिरीचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येतो.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी
1. राजीव गांधी खेलरत्न : बजरंग पुनिया ( कुस्ती) आणि दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)
2. जीवनगौरव पुरस्कार : संजय भरद्वाज ( क्रिकेट), रंबीर सिंह खोक्कर ( कबड्डी), मेर्झबान पटेल ( हॉकी)
3. द्रोणाचार्य पुरस्कार : विमल कुमार ( बॅडमिंटन), मोहिंदर सिंह ढिल्लोन ( अॅथलिट), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस)
4. अर्जुन पुरस्कार : रवींद्र जडेजा (क्रिकेट),अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), पूनम यादव ( क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), तजिंदरपालसिंह तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनस याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), चिंग्लेनसाना सिंह कंगुजान ( हॉकी), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरनसिंह शेरगिल ( पोलो), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट)
5. ध्यानचंद पुरस्कार : मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)