मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड स्थानकादरम्यान, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी  त्यामुळे आज मुंबईकरांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडल्यास त्रास कमी होऊ शकतो.


मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 9.52 वाजेपासून ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.


हार्बर रेल्वे


हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 वाजेपासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान कुर्ला ते वाशी वाहतूक बंद राहणार आहे.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 वाजेपासून ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.