नवी दिल्लीः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी जागतिक जाहिरात विश्वातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियातील स्पार्टन स्पोर्ट्स या कंपनीचा धोनीसोबत करार असताना 20 कोटींची फसवणूक केल्याची माहिती आहे.

 

 

धोनीचा स्पार्टन स्पोर्ट्ससोबत तीन वर्षांसाठी बॅटचा आणि उत्पादनासाठी 13 कोटींचा करार आहे. मात्र हा करार कंपनीने बुडवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

स्पार्टन कंपनी कमाईमध्ये तोट्यात आल्यामुळे असा प्रकार केला असावा असा अंदाज लावला जात आहे. मात्र बॅटच्या रॉयल्टीची रक्कम पकडल्यास कंपनीने धोनीची 20 कोटींपेक्षा जास्त फसवणूक केली आहे.

 

 

स्पार्टन कंपनीने करारानंतर केवळ चार हफ्त्यांचा भरणा केला आहे. शेवटचा भरणा मार्च 2016 मध्ये केला आहे. हे प्रकरण लवकरच मिटेल असा विश्वास धोनीची व्यवस्थापन कंपनी रिती स्पोर्ट्सने व्यक्त केला आहे.