मेलबर्न : टेनिसमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते, त्या जगज्जेत्या रॉजर फेडररला एका 20 वर्षाच्या टेनिसपटूने पराभूत केले आहे. ग्रीसचा युवा टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी इतिहास घडवला. स्टेफानोसने फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत केले आहे. या पराभवामुळे फेडररचे ऑस्ट्रेलियन ओपनमधले आव्हान संपुष्टात आले आहे.
फेडररला पराभूत करुन सिटसिपासने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ग्रँड स्लॅम या मानाच्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो ग्रीसचा पहिला टेनिसवीर ठरला. सिटसिपासकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपनचे सातवे विजेतेपद पटकावण्याची फेडररची संधी हुकली आहे. जागतिक क्रमवारीतल्या नंबर टू अँजेलिक कर्बरलाही महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सने तिचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडवला.
सिटसिपास आणि फेडररमधील आजचा सामना तब्बल तीन तास 45 मिनिटे सुरु होता. सिटसिपास सामन्याचा पहिला सेट हरला. तरिदेखील पुढचा सेट खेळताना तो जराही दबावाखाली खेळला नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्याने फेडररला 7-6 असे नमवले. पावणेचार तास दोघांनी एकमेकांना चांगलेच झुंजवले. अखेर चारपैकी तीन सेट सिटसिपासने जिंकत सामना आपल्या नावावर केला.
सामन्यानंतर सिटसिपास म्हणाला की, "मी सहा वर्षाचा होतो तेव्हापासून रॉजरला खेळताना पाहतोय. गेल्या काही वर्षांपासून तो खूप जबरदस्त खेळतोय. त्याच्याविऱोधात खेळणे आणि जिंकणे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासरखे आहे."
ऑस्ट्रेलियन ओपन : 20 वर्षाच्या टेनिसपटूकडून रॉजर फेडरर पराभूत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2019 08:54 PM (IST)
सचा युवा टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी इतिहास घडवला. स्टेफानोसने फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -