नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने अनुसूचित जातींमधील लोकांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात अनुसूचित जातींच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते. या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, "काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. परंतु आता तसे करणे काँग्रेसला शक्य होणार नाही. कारण आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पक्षश्रेष्ठींना वाटेल त्या व्यक्तीला त्यांनी नेता बनवले होते. त्यामध्ये ठेकेदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यभरातील अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरांमध्ये काँग्रेसने वीजही पोहचवली नव्हती. पंरतु भारतीय जनता पक्षाने सर्वांसाठी सौभाग्य योजना आणली. या योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज, एलईडी बल्ब पोहोचले. उज्ज्वला योजनेद्वारे लोकांच्या घरी गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. ज्या घरांना या योजनांचा लाभ मिळाला त्यापैकी 60 टक्के घरं अनुसूचित जातींमधील लोकांची होती.
काँग्रेसकडून अनुसूचित जातींच्या लोकांचा केवळ मतांसाठी वापर : देवेंद्र फडणवीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2019 06:02 PM (IST)
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने अनुसूचित जातींमधील लोकांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात अनुसूचित जातींच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -