कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातल्या कसोटी मालिकेत पराभव होण्याची वाटत असलेली भीती हेच टीम इंडियाच्या शिलेदारांच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरच्या शाब्दिक हल्ल्याचं कारण असल्याचं टीका वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं केली आहे.
भारत दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळलेल्या स्टार्कला पायाच्या दुखापतीच्या कारणास्तव भारत दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.
पुण्याच्या पहिल्या कसोटीत बसलेल्या अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून टीम इंडिया अजूनही सावरलेली नाही. त्यामुळंच टीम इंडियाच्या शिलेदारांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर शाब्दिक हल्ले करण्याचा पवित्रा घेतला असल्याचा दावा स्टार्कनं केला आहे.