सराव सामन्यात हेजलवूडच्या बाऊन्सरवर डेव्हिड वॉर्नर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2017 01:24 PM (IST)
एका सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर बाऊन्सरवर जखमी झाल्याचं वृत्त समजतं आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका सराव सामन्यात जॉश हेजलवूडच्या बाऊन्सरवर जखमी झाल्याचं वृत्त समजतं आहे. सराव सामन्यात खेळत असताना हेजलवूडच्या बाऊन्सरवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न वॉर्नरनं केला पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या मानेवर लागला. चेंडू लागताच वॉर्नर खाली कोसळला. पण त्यानंतर तो त्याकाळ उभा राहिला आणि त्यानं हेल्मेट काढलं आणि मैदान सोडलं. सुदैवानं वॉर्नरची दुखापत गंभीर नाही. मात्र, असं असलं तरी वॉर्नर मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, 2014 साली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूजचा मानेजवळ चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.