मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे.  आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.


या बैठकीत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर

दुसरीकडे रावसाहेब दानवे आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचीही गच्छंती होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची अडचणी झाली. तर पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत. त्यामुळे सावरांना आपला कारभार आवरावा लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर 

देसाई-मेहतांचं राजीनामानाट्य, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे फेटाळले

तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले! 

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता 

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश