Australia vs India, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी पिंक बाॅल कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जात आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेकपर्यंत भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत मिचेल स्टार्कने विराट कोहली (7 धावा), केएल राहुल (37 धावा) आणि यशस्वी जैस्वाल (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डावाच्या पहिल्या चेंडूवर भारताने विकेट गमावली. भारताची टाॅप ऑर्डर स्टार्कने भेदत ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेलं आहे. 






स्टार्कचा कोहलीला गुलिगत धोका 


विराट कोहली अवघ्या 7 धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने स्टीव्ह स्मिथच्या हाती झेलबाद केले. स्टार्कने दिलेल्या चकव्याने कोहली स्लीपमध्ये अलगद शिकार झाला. त्यामुळे स्टार्कची चतुराई पाहून समालोचक सुद्धा चकित झाल्याचे दिसून आले. तत्पूर्वी, जैस्वालला पहिल्याच चेंडूवर बाद स्टार्कने हादरा दिला होता, तर दोन जीवदान मिळालेल्या राहुलला सुद्धा (37 धावा) बाद करून स्टार्कने टीम इंडियाला भगदाड पाडले. चहापानासाठी खेळ थांबण्यास काही षटके बाकी असतानाच स्कॉट बोलंडच्या चेंडूवर शुबमन गिल 31 धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 81/4 अशी झाली. या सामन्यात जोश हेझलवूडच्या जागी खेळत असलेल्या बोलंडची ही पहिली विकेट होती. 


तत्पूर्वी, पिंक कसोटीत भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला (0) बाद केले होते. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी सावध खेळ केला. यानंतर दोघांनी स्कोअरकार्ड 69 धावांपर्यंत नेले. येथेच स्टार्कने केएल राहुलला (३७) नॅथन मॅकस्विनीकडे झेलबाद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या