सिडनी : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या कांगारूंच्या संघात अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लायनवर फिरकी माऱ्याची जबाबदारी राहील.


लायनच्या साथीने अॅश्टन अॅगर आणि स्टीव्ह ओकीफी हे दोन डावखुरे फिरकी गोलंदाज आणि नवोदित लेग स्पिनर मिशेल स्वेपसनलाही ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालं आहे. त्याशिवाय अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलनेही तब्बल दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केलंय.

23 फेब्रुवारीला पुण्यातील कसोटीने या मालिकेची सुरूवात होणार आहे. या मालिकेतील उर्वरीत कसोटी बंगळुरू, रांची आणि धर्मशालामध्ये खेळवल्या जातील.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अॅगर, जॅक्सन बर्ड, पीटर हॅड्सकोंब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन ल्योन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव ओकीफी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर)