भारतात 5G फोनची क्रेझ हळूहळू वाढत आहे. रियलमी (Realme) मोबाइल कंपनी लवकरच परवडणाऱ्या किंमतीत 5G स्मार्टफोनची घोषणा करू शकते. हे फोन नवीन तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सज्ज असतील अशी अपेक्षा आहे. हे रियलमी स्मार्टफोन Realme X7 Series अंतर्गत लॉन्च केले जातील.


रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ही माहिती ट्विट केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की, कंपनी पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस Realme X7 मालिकेतील फोन Realme X7 आणि Realme X7 Pro बाजारात आणेल, जे कमी किंमतीत 5G कनेक्टिव्हिटीसह बाजारात येतील. रियलमीच्या या सीरीजच्या स्मार्टफोनची किंमत 15-25 हजार रुपयांदरम्यान असेल.


कंपनी हे 5G फोन बाजारात लॉन्च करणार


चीनी कंपनी रियलमीचा Realme X50 Pro स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. ही माहिती माधव सेठ यांनी ट्विटरद्वारेही दिली आहे. हा 5 जी फोन उत्तम वैशिष्ट्यांसह आहे. सध्याच्या काळात 5 जी फोनची मागणी खूप वाढली आहे, अशा परिस्थितीत सर्व कंपन्या लवकरात लवकर 5 जी फोन घेऊन बाजारात वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.



Realme X सीरीज मधील फोनची वैशिष्ट्ये


आतापर्यंत एक्स मालिकेच्या लॉन्चची तारीख निश्चित केलेली नाही, परंतु त्यांच्या स्पेसिफिकेशनपासून किंमतीपर्यंतची काही माहिती पुढे येत आहे. Realme X7 मध्ये 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनचा रीफ्रेश दर 120Hz असेल. यात 8GB RAM आणि 64GB, 128GB स्टोरेजसह मिळणार आहे. तसेच, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 800U SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे.


फोनचा फ्रंट कॅमरा 32 मेगापिक्सल आणि रियर कैमरा 64 मेगापिक्सल असण्याची शक्यता आहे. फोनची बॅटरी 4,300mAh असेल. तर रियलमी एक्स7 प्रो विषयी सांगायचं म्हटलं तर हा फोन 6.55 इंचाच्या फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येणार आहे. 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये येण्याची शक्यता आहे. या फोनमध्येही MediaTek Dimensity 1000+ SoC प्रोसेसर असेल. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असेल.