मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आजारामुळे क्रिकेटपासून काही काळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याचं सांगत मॅक्सवेलने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यात मॅक्सवेलला संघात स्थान देण्यात आलं होतं. मॅक्सवेलने पहिल्या सामन्यात फक्त 28 चेंडूंमध्ये 68 धावांची खेळी होती.

मॅक्सवेलला सध्या मानसिक आजाराने ग्रासले असून काही काळासाठी त्याने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे मानसोपचार तज्ज्ञ मायकल लॉयड यांनी सांगितले. आगामी सामन्यांसाठी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी ऑस्ट्रेलियाकडून डार्सी शॉर्टला खेळवण्यात येणार आहे.


आम्ही आमच्या खेळाडूंची चिंता करतो आणि आमचा मॅक्सवेलला पूर्ण पाठिंबा आहे, असं मतं ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. 2020 साली ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशाचं मॅक्सवेलचं संघात राहणं महत्त्वाचं असल्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होण गरजेचं आहे, त्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील राहील.