Health Tips : कर्करोग (Cancer) हा एक गंभीर आजार आहे, जो वेळेत ओळखला नाही तर प्राणघातक ठरू शकतो. यातील एक प्रकार म्हणजेच त्वचेचा कर्करोग (Skin Cancer). साधारणपणे, त्वचेच्या कर्करोगाची प्रकरणं भारतात क्वचितच आढळतात. पण, कधीकधी माहितीच्या अभावामुळे लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यावर वेळीच उपचार घेणं केवळ अशक्य होतं. अशा परिस्थितीत त्वचेच्या कॅन्सरची कारणं, लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय नेमके कोणते आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

  


'त्वचेचा कर्करोग' म्हणजे काय?


क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, डीएमए खराब झाल्यामुळे पेशींची असामान्य वाढ हे या प्रकारच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. त्याचा धोका मुख्यतः शरीराच्या त्या भागांवर असतो जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, म्हणजे शरीराचे ते भाग जे कपड्यांखाली झाकलेले असतात. चला जाणून घेऊयात अशी लक्षणं ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.


स्किन कॅन्सरची लक्षणं



  • त्वचा सतत सोलली जाणे 

  • त्वचेवर सतत जळजळ होणे

  • शरीराच्या कोणत्याही भागात सतत विनाकारण खाज सुटणे

  • त्वचेवर नवीन डाग किंवा पुरळ तयार होणे

  • त्वचेच्या जखमा बराच काळ बऱ्या न होणे

  • कान, मान किंवा खाजगी भागांभोवती डाग किंवा लाल चट्टे तयार होणे


त्वचेच्या कर्करोगाची कारणे



  • गोरी त्वचा ज्यामध्ये मेलेनिन कमी आढळते. त्वचेच्या रंगद्रव्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

  • पूर्वी जळलेल्या त्वचेवरही या प्रकारच्या कर्करोगाचा धोका असतो.

  • जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

  • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील याचे कारण असू शकते.

  • हे अनुवांशिक कारणांमुळे देखील होऊ शकते, म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित कौटुंबिक इतिहास असेल तर...


त्वचेचा कर्करोग कसा टाळावा?



  • शरीरावर सनस्क्रीनचा जास्त वापर करा.

  • जास्त वेळ उन्हात राहणे टाळा.

  • चांगला आणि संतुलित आहार घ्या.

  • उन्हात चांगले झाकलेले कपडे घाला.

  • शरीराला हायड्रेट ठेवा, म्हणजे भरपूर पाणी प्या.

  • जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

  • नियमित त्वचेची तपासणी करत राहा. 

  • या पद्धतीची काळजी घेतली तर धोका वेळीच टाळता येतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका