टॅम्पर, फिनलंड : भारताची धावपटू हिमा दासने 'सुवर्ण'मयी विक्रमाला गवसणी घातली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला.
फिनलंडमधील टॅम्परमध्ये आयएएएफ वर्ल्ड अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप सुरु आहे. हिमाने महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली.
हिमा दासने चारशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत 51.46 सेकंदांची वेळ नोंदवली. 18 वर्षांची हिमा आसामची रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये ती सहावी आली होती.
या स्पर्धेत रोमानियाची अँड्रिया मिकलोस हिने रौप्यपदक, तर अमेरिकेच्या टेलर मॅन्सन हिने कांस्यपदकाची कमाई केली.
भारताच्या नीरज चोप्राने 2016 साली या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत नवा विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर हिमा दासही नीरज चोप्राच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.
भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 07:49 AM (IST)
फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन धावपटू हिमा दासने नवा इतिहास घडवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -