Asian Games 2023 : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लूट सुरु आहे. भरातीय खेळाडूंनी आतापर्यंत 55 पदकांवर नाव कोरलेय. चीन पदाकांमध्ये अव्वल स्थानावर आहे. पण यजमान चीनचा रडीचा डाव समोर आलाय. भारतीय खेळाडू ज्योती याराजीच्या तत्परतेमुळे चीनच्या खेळाडूची चोरी पकडली गेली. ज्योतीने तात्काल याबाबत आवज उठवला अन् चीनच्या खेळाडूचा डाव हाणून पाडला. 


ज्योती याराजी हिला मिहिला 100 मीटर हर्डल स्पर्धेत रौप्य पदक मिळालेय. आधी ज्योतीला कांस्य पदक देण्यात येणार होते, पण अपग्रेट करण्यात आले. चीनची महिला खेळाडूने रडीचा डाव केला होता. त्यानंतर स्पर्धेत मोठा वाद उफळला होता. भारताच्या ज्योती याराजी हिने चीनच्या खेळाडूची चोरी पकडली, अन् परिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ज्योतीला रौप्य पदक देण्यात आले. दोषी आढळलेल्या चीनच्या खेळाडूचे पदक काढून घेण्यात आले.


महिला 100 मीटर हर्डल रेसमध्ये चीनची यानी वू हिने चुकीची सुरुवात केली. वेळेआधीच काही सेकंद तीने धावण्यास सुरुवात केली होती. याबाबत भारताच्या ज्योतीला समजले. ज्योतीने याबाबत आवाज उठवला. त्यानंतर चीनच्या खेळाडूने आपली चूक मान्य करण्याऐवजी ज्योतीवरच आरोप केले. ज्योतीने चुकीची सुरुवात केली, असा आरोप चीनच्या यानी वू हिने केला होता. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. पंचांनी ज्योतीला स्पर्धेतून बाद केले. पण ज्योतीने मैदान सोडले नाही.ज्योती आपल्या मतावर ठाम राहिली.  त्यानंतर पंचांनी याचा रिप्लेमध्ये पाहिला.


रिप्लेमध्ये चीनच्या यानी वू हिनेच चुकीची सुरुवात केल्याचे दिसले. पंचांनी चीनच्या खेळाडूला दोषी ठरवले अन् स्पर्धेतून बाद ठरवले. तिच्याकडून पदकही काढून घेतले. भारताच्या ज्योतीने हिंमत दाखवल आवाज उठवला, त्यामुळे चीनच्या खेळाडूविरोधात कारवाई करण्यात आली. ज्योती ही घटना होण्याआधी तिसऱ्या क्रमांकार होती, तिला कांस्य पदक मिळाले असते. पण चीनची खेळाडू स्पर्धेतून बाद ठरल्यामुळे ज्योतीला रौप्य पदक मिळाले.





























 
 


रविवार अखेरीस गुणतालिकेची स्थिती काय ? कोणत्या देशाने किती पदके पटकावली ?


चीन-  (132 सुवर्णपदक), (72 रौप्य), (39 कांस्य) एकूण 243 मेडल


कोरिया- (30 सुवर्णपदक), (35 रौप्य) (60 कांस्य) - एकूण 125 मेडल


जापान- (29 सुवर्णपदक), (41 रौप्य), ( 42 कांस्य) - एकूण 112 मेडल


भारत- (13 सुवर्णपदक), (21 रौप्य), (19 कांस्य) - एकूण 53 मेडल


उज्बेकिस्तान- (11 सुवर्णपदक),  (12 रौप्य), (17 कांस्य) - एकूण 40 मेडल


थायलँड- (10 सुवर्णपदक), (6 रौप्य), (14 कांस्य)- एकूण 30 मेडल


चीनी ताइपै- (9 सुवर्णपदक),  (10 रौप्य),  (14 कांस्य)- एकूण 33 मेडल


हाँगकाँग- (6 सुवर्णपदक), (15 रौप्य),  (19 कांस्य)- एकूण 40 मेडल


उत्तर कोरिया- (5 सुवर्णपदक),  (9 रौप्य),  (5 कांस्य) - एकूण 19 मेडल


इंडोनेशिया- (4 सुवर्णपदक), (3 रौप्य), (11 कांस्य)- एकूण 18 मेडल