जकार्ता : इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारताच्या झोळीत आणखी एक पदक पडलं आहे. भारताचा 15 वर्षीय नेमबाज शार्दुल विहानने रुपेरी यश मिळवलं आहे. मूळचा मेरठ असलेल्या शार्दुलने डबल ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई केली.
कोल्हापूरच्या राही सरनोबतचा सुवर्णवेध, भारताला आणखी एक गोल्ड
कोरियाचा शिन ह्यूनवू आणि शार्दुलमध्ये सुवर्णपदकासाठी अतिशय चुरशीची स्पर्धा दिसून आली. अखेर अनुभवी शिन ह्यूनवूने (74 गुण) सुवर्ण पदकाच्या शर्यतीत बाजी मारली. अंतिम फेरीत 73 गुण मिळवत शार्दुल विहानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र त्याची ही कामगिरी भविष्याच्या दृष्टीने अपेक्षा उंचावणारी मानली जात आहे. तर कतारच्या अल मारी हमाद अलीला कांस्य पदक मिळालं, त्याचा स्कोअर होता 53 गुण.
आशियाई स्पर्धा : 10 मिटर एअर रायफल शुटींगमध्ये भारताचा 'रौप्य'वेध
एशियाडमध्ये पदक जिंकणारा शार्दुल हा तिसरा टीएनज नेमबाज आहे. त्याच्याआधी सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण आणि लक्ष्य शेरॉनने ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.
आशियाई स्पर्धा : 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला 'कांस्य'
यासोबतच भारताच्या पदकांची संख्या 17 वर पोहोचली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकं जमा झाली आहेत. पदक तालिकेत भारत नवव्या क्रमांकावर आहे.
Asian Games 2018 : 15 वर्षीय नेमबाज शार्दुल विहानला रौप्य पदक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2018 03:45 PM (IST)
यासोबतच भारताच्या पदकांची संख्या 17 वर पोहोचली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकं जमा झाली आहेत. पदक तालिकेत भारत नवव्या क्रमांकावर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -