मुंबई: महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून केरळला मदत पाठवली जात आहे. देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल 51 कोटी रुपयांचं आवश्यक साहित्य पाठवणार आहे.


रिलायन्सने देऊ केलेली ही मदत, अनेक राज्यांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचंच बोलायचं झालं, तर फडणवीस सरकारने केरळसाठी 20 कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राची ही मदत अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. आता रिलायन्सने त्यापेक्षा जास्त दिली आहे.


रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी केरळमधील जनतेप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. "केरळचे नागरिक कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन आवश्यक ती सर्व मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची मदत देत आहोत" असं नीता अंबानी यांनी सांगितलं.

Kerala Flood: शाहरुख, जॅकलिन, प्रभास, कमल हसन, केरळला कोणाची किती मदत?

इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशनने केरळमध्ये नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, पुनर्वसन केंद्र, शाळा, रुग्णालयांची डागडुजी करण्याची घोषणाही केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने केरळसाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय केरळला या मोठ्या संकटातून उभा करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

केरळला यूएईने देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्राने नाकारली! 

यूनायटेड अरब अमिरातने (यूएई) केरळच्या मदतीसाठी 700 कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. मात्र भारत सरकारने यूएईडून मदतनिधी घेण्यास नकार दिला आहे. यूएईने देऊ केलेल्या 700 कोटी रुपयांच्या मदतनिधीला भारत सरकारने अत्यंत विनम्रतेने नकार दिला आहे. देशाअंतर्गत संकटांना आपणच तोंड देत, त्यातून बाहेर पडायचं, असं भारत सरकारचं असं धोरण आहे. याच धोरणानुसार केंद्र सरकारने केरळ सरकारला परदेशी मदतीसाठी विनम्र नकार कळवण्यास सांगितले आहे.

केरळला यूएईने देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्राने नाकारली!  

केरळ महापूर | स्पेशल रिपोर्ट | विकासाच्या नावाखाली आपण देशाची वाट लावली?  

1 लाख गायी, 4 लाख कोंबड्या वाहून गेल्या, केरळचे 20 हजार कोटी पाण्यात  

Kerala Flood: शाहरुख, जॅकलिन, प्रभास, कमल हसन, केरळला कोणाची किती मदत?