Asian Champions Trophy : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. गुरजीत कौरच्या (Gurjit Kaur) अप्रतिम गोल्सच्या मदतीने भारताने थायलंडला 13-0 ने मात दिली आहे. वंदना कटारीयाने (Vandana Katari) देखील सामन्यात चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच सामना असून या विजयामुळे भारताने आघाडी घेतली आहे.





 


सामन्यात सुरुवातीपासून भारतीय महिलांनी आपला दबदबा कायम ठेवला. गुरजीतने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. पुढील पाच मिनिटांत वंदना कटारियाने आणखी एक गोल केला. पहिलं सत्र संपताना लिलीमा मिन्जने तिसरा गोल केला. त्यानंतर 14 आणि 15 मिनिटाला गुरजीत आणि ज्योतीने 1-1 गोल करत भारताला 5-0 ची आघाडी घेऊन दिली.  दुसऱ्या सत्रातही भाताने गोल्सची बरसात केली. 25 मिनिटांपर्यंत भारताने 9 गोल केले. त्यानंतर अखेरच्या काही मिनिटांत आणखी हगोल करत भारताने सामना 13-0 च्या फरकाने जिंकत एका मोठ्या विजयाची नोंद केली.



आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा 5 ते 12 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये भारत, यजमान कोरिया, चीन जपान, थायलंड, मलेशिया या देशांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज थायलंडविरुद्ध पार पडला असून भारताने यात विजय मिळवला आहे. भारताचा दुसरा सामना 6 डिसेंबरला मलेशिाविरुद्ध होणार आहे.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha