Virat Kohli in Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. आता आशिया चषक 2022 च्याच सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सुपर-4 फेरीचा हा सामना उद्या अर्थात 4 सप्टेंबर रोजी होणार असून पहिल्या सामन्याप्रमाणे अनेकांच्या नजरा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असेल. त्यात कोहलीने हाँगकाँगविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्याने तो पुन्हा फॉर्ममध्ये येत असल्याचं दिसत आहे. अशात त्याची नजर एका खास रेकॉर्डवर असणार आहे. 


विराट कोहली अनोखं शतक ठोकण्यासाठी सज्ज


विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आतापर्यंत 97 षटकार मारले आहेत. अशाप्रकारे तो 100 षटकारांपासून फक्त 3 षटकार दूर आहे. 3 षटकार मारल्यानंतर विराट कोहली खास शतक पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त रोहित शर्माच हा पराक्रम करू शकला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माचे फक्त नाव असून आता कोहलीही या यादीत सामिल होऊ शकतो. त्यामुळे विराट एक खास शतक अर्थात षटकारांचे शतक पूर्ण करु शकतो.  


कॅप्टन रोहित शर्मा आहे अव्वलस्थानी


भारतीय कर्णधार रोहित शर्माने 134 सामन्यात 165 षटकार ठोकले आहेत. त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकले आहेत. 3 षटकार मारल्यानंतर विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा 10 वा फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 101 सामन्यात 97 षटकार मारले आहेत. दुसरीकडे.न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल सध्या सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 121 सामन्यात 172 षटकार मारले आहेत.


हे देखील वाचा-


Asia Cup 2022 : चेन्नई सुपरकिंग्स आणि जाडेजामध्ये वादाची चर्चा, पण CSK ने शेअर केलेली खास पोस्ट पाहाच 


IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' पाच फलंदाजांवर सर्वांची नजर, एकट्याच्या जीवावर जिंकवू शकतात सामना