Rohit Sharma Record India vs Sri lanka Asia Cup 2022 : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकातील सुपर 4 मधील सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. राहुल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं भारतीय संघाचा डाव सावरला आहे. रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करताना 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
गप्टिलचा विक्रम मोडला -
श्रीलंकाविरोधात रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करताना षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजाचा क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहचलाय. रोहित शर्मानं मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढलाय. रोहित शर्माच्या नावावर प्रथम फलंदाजी करताना 102 षटकाराची नोंद झाली आहे. 101 षटकारासह दुसऱ्या क्रमांकावर मार्टिन गप्टिल आहे.
पाकिस्तानच्या आफ्रिदीलाही टाकले मागे -
रोहित शर्मानं पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचाही विक्रम मोडीत काढला आहे. रोहित शर्मा आशिया चषकात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरलाय. रोहित शर्मानं आशिया चषकामध्ये 27 षटकार लगावले आहेत. शाहिद आफ्रिदीच्या नावावर 26 षटकाराची नोंद आहे. आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 23 षटकारासह श्रीलंकेचा सनथ जयसुर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एम एस धोनी आणि सुरेश रैना 18-18 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहेत.
रोहित शर्मानं डाव सावरला -
केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मानं भारताचा डाव सावरला. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं चार षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत 58 चेंडूत 97 धावांची भागिदारी केली. रोहित-शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीमुळे भारताचा डाव सावरला.
भारताने नाणेफेक गमावली -
मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेकीचा कौल गमावला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला. रवी बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.