India Vs Sri Lanka : मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेकीचा कौल गमावला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. रवी बिश्नोईला वगळण्यात आले आहे. रवी बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. 


भारताचा संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दीपक हुडा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.






श्रीलंकेचा संघ:
पाथुम निसानका, कुसल मेंडिस, चरित असलंका, दनुष्का गुणातिलका, दासुन शनाका, भानुका राजपाक्षे, वानिंदु हसनंगा, चमिका करुणारत्ने, महिष थिक्षण, असिता फर्नान्डो, दिलशान मदुशंका










भारतासाठी आजचा सामना महत्वाचा
भारतासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. श्रीलंकाविरुद्ध पराभव झाल्यास भारताला अंतिम फेरी गाठणं अवघड होईल. भारत अशा परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.   दुसरीकडे, श्रीलंकानं सुपर 4 फेरीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तसेच श्रीलंकेनं भारताविरुद्ध सामना जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.


भारत-श्रीलंकेचा अलिकडचा फॉर्म
दरम्यान, दोन्ही संघांचा अलीकडचा फॉर्म पाहता भारतीय संघाच पारडं जड दिसतंय. भारतानं यावर्षी 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, 5 सामने गमावले आहेत. एक सामना निर्णित ठरला. दुसरीकडं श्रीलंकेच्या संघानं यावर्षी 14 टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी श्रीलंकेला चार सामने जिंकता आले. तर, 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यातील एक सामना अनिर्णित राहिलाय.


भारत-श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 25 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले गेले. यातील भारतानं 17 सामने जिंकले आहेत. तर, 7 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. यावर्षी भारत आणि श्रीलंका यांच्याती तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. ही मालिका भारतानेच जिंकली होती.