Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील गट सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. यामुळं पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरेल. तर भारतीय संघ आपली विजयी कामगिरी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत असणार आहे. त्यामुळं आजच्या या महामुकाबल्यात कोणाचा विजय होणार? हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.


भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जवळपास सर्वच सामने रोमहर्षक ठरलेत. परंतु, दोन्ही दोन्ही संघ आशिया चषक आणि आयसीसी एव्हेंटमध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध खेळतात.दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 16 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 9 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, पाकिस्तानला पाच सामने जिंकता आली आहेत. यातील दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. आशिया चषकातील आकडेवारी पाहता भारताचं पारडं जडं दिसतंय.


कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 4 सप्टेंबर ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


संघ-


भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आर अश्विन.


पाकिस्तानचा संभाव्य संघ:
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रउफ, हसन अली.


हे देखील वाचा-