Rahul Dravid Asia Cup 2022 : भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा मुख्य क्रिडा प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. आशिया कप 2022 (Asis Cup 2022) च्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता लवकरच राहुल द्रविड भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. दुबईमध्ये आज आशिया कपसाठी भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधीच राहुल द्रविड संयुक्त अरब अमिरातीसाठी (UAE) रवाना होणार आहे.


व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर संघाची जबाबदारी


आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे बीसीसीआयनं (BCCI) भारतीय संघाचा हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याची निवड केली होती. आता राहुल द्रविडचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर लवकरच तो पुन्हा संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळेल.






आज भारत पाकिस्तान महामुकाबला


भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज 'मैदान-ए-जंग' होणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आशिया कप स्पर्धेतील भारताचा हा पहिला सामना आहे. आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आज भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा सामना रंगणार आहे. ही मॅच दुबईमधील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी 07.30 वाजता पार पडणार आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान संघ चौदा वेळा आशिया कपमध्ये आमने-सामने आला आहे. आजचा भारत आणि पाकिस्तान सामना 15 वा आशिया कपमधील सामना खेळणार आहे.


भारताकडे पराभव भरून काढण्याची संधी
ट्वेन्टी-ट्वेन्टी (20-20) विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानकडून टीम इंडियाच्या झालेल्या या पराभवाला दहा महिने उलटलेयत. पण दुबईतल्या त्या पराभवानं करोडो भारतीय क्रिकेटरसिकांच्या हृदयावर झालेली जखम अजूनही ओली आहे. 
विराट कोहली आणि त्याच्या टीम इंडियाच्या त्या मानहानीचा वचपा काढण्याची संधी रोहित शर्मा आणि भारतीय संघाला मिळणार आहे. यावेळी रणांगण ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकाचं असलं, तरी योगायोगाची बाब म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं विराटसेनेचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला त्याच दुबईच्या मैदानात पाकिस्तानवर बाजी उलटवण्याचा मौका रोहित शर्माच्या टीम इंडियाला मिळणार आहे.