India vs Hong Kong playing 11 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) या स्पर्धेत भारत आता हाँगकाँगविरुद्ध (India vs Hong kong) मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून आघाडीवर असल्याने भारताचा आजचा विजय थेट सुपर 4 मध्ये भारतीय संघाला पोहोचवेल. त्यामुळे आजचा सामना जरी हाँगकाँग विरुद्ध असला तरी भारतासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना आहे. त्यामुळे भारतीय संघात काही बदलही होऊ शकतात.


हाँगकाँगविरुद्ध ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. या सामन्यात त्याला दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळू शकते. पंत संघात येण्याने भारतीय संघाच्या मधल्या फळीत डाव्या हाताचा पर्याय उपलब्ध करून देतो. जे संघासाठी फायदेशीर ठरू शकते. पंतशिवाय रोहित शर्मा रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश करू शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खान पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करु न शकल्याने हे बदल होऊ शकतात. 


संभाव्य अंतिम 11


भारत


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.


हाँगकाँग


यासीम मुर्तझा, निझाकत खान (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाझ खान, स्कॉट मॅकेचनी (यष्टीरक्षक), झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला


सामना अटीतटीचा होण्याची शक्यता


भारत आणि हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निझाकत खान म्हणाला की, ''आम्ही भारताविरुद्ध 2018 आशिया चषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळलो होतो. आम्ही तो सामना फक्त 20 धावांनी गमावला. टी-20 सामन्यात काहीही होऊ शकते. कोणत्या षटकात गोलंदाज कधी चांगली गोलंदाजी करेल किंवा फलंदाज कधी स्फोटक धावा काढेल हे तुम्हाला माहीत नाही. आघाडीचे संघ कसे पराभूत झाले हे देखील आपण यापूर्वी पाहिले आहे. आम्ही सकारात्मक माइंडसेटने मैदानात जाणार आहोत.'' दरम्यान खानच्या या वक्तव्यावरुन भारत विरुद्ध हाँगकाँग सामना चुरशीचा होऊ शकतो. 


हे देखील वाचा-