T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान, इंग्लंडच्या विजयात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात जोस बटलरनं 80 आणि अॅलेक्स हेल्सनं 86 धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर बटलर आणि हेल्स यांनी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडलाय.

बटलर आणि हेल्सची भागीदारी ही टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरलीय. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्या नावावर होता. या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या दोन फलंदाजांमध्ये 168 धावांची भागीदारी झाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर महेला जयवर्धनं आणि कुमार संगकारा ही जोडी आहे, ज्यांनी 2010 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 166 धावांची भागेदारी केली होती. या यादीत चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची जोडी आहे, ज्यांनी 2021 मध्ये भारताविरुद्ध नाबाद 152 धावांची खेळी केली होती.

टी-20 विश्वचषकातील सर्वोच्च भागेदारी:

क्रमांक फलंदाज विरुद्ध संघ धावा वर्ष
1 जोस बटलर -अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) भारत 170* 2022
2 क्विंटन डी कॉक - रिले रुसो (दक्षिण आफ्रिका) बांगलादेश 168 2022
3 महेला जयवर्धने - कुमार संगकारा (श्रीलंका) वेस्ट इंडीज 166 2010
5 बाबर आझम- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) भारत 152 2021

 

टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वोच्च भागेदारी:

क्रमांक फलंदाज धावा वर्ष ठिकाण
1 क्विंटन डी कॉक - डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका) 174* 2022 गुवाहाटी
2 जोस बटलर -अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) 170* 2022 अॅडिलेड
3 बाबर आजम - मोहम्मद रिजवान 152* 2021 दुबई

 

टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वोच्च भागेदारी:

क्रमांक फलंदाज विरुद्ध संघ धावा वर्ष
1 डेविड मालन - इयोन मॉर्गन न्यूझीलंड 182 2019
2 जोस बटलर- अॅलेक्स हेल्स भारत 170* 2022
3 जोस बटलर - डेविड मालन दक्षिण आफ्रिका 167* 2022

 

हे देखील वाचा-