Asia Cup Winner List: पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) यांच्यात आज (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर, यापूर्वी अर्धातास 7.00 वाजता नाणेफेक होईल. या सामन्यात आशिया चषक 2022 स्पर्धेचा नवा चॅम्पियन कोण? हे जवळपास निश्चित होणार आहे. यापू्र्वी आशिया चषक विजेत्यांच्या यादीवर एक नजर टाकुयात.
दरम्यान, 1983 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 14 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं पाच वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकलीय. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आलाय.
आशिया चषक विजेत्या संघाची यादी:
क्रमांक | वर्ष | विजयी संघ |
1 | 1983/84 | भारत |
2 | 1985/86 | श्रीलंका |
3 | 1988/89 | भारत |
4 | 1990/91 | भारत |
5 | 1994/95 | भारत |
6 | 1997 | श्रीलंका |
7 | 2000 | पाकिस्तान |
8 | 2004 | श्रीलंका |
9 | 2008 | श्रीलंका |
10 | 2010 | भारत |
11 | 2011/12 | पाकिस्तान |
12 | 2013/14 | श्रीलंका |
13 | 2016 | भारत (टी-20) |
14 | 2018 | भारत |
श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आज लढत
श्रीलंकेच्या संघानं आतापर्यंत पाच वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे आणि तो या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. तर, पाकिस्ताननं आतापर्यंत दोनदा आशिया चषक जिंकला असून आता तिसर्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या त्यांचा प्रयत्न असेल.
हे देखील वाचा-