ढाका : भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून आशिया चषक हॉकीत सलग तिसरा विजय साजरा केला. बांगलादेशातल्या ढाक्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात चिंगलसेनानं सतराव्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं. मग रमणदीपससिंगनं 43 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल डागला. त्यानंतर दोनच मिनिटांमध्ये हरमनप्रीतसिंगनं पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल झळकावला.
आजच्या विजयामुळे भारतीय हॉकी संघ सुपर फोर राऊंडमध्ये पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत ग्रुप ‘ए’ मधील साखळी सामन्यात सलग तीन विजय मिळवलेत. तर पाकिस्तानने आतापर्यंत एक विजय, एक पराभव आणि एक सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.
दरम्यान, त्याआधी, या स्पर्धेतल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतानं जपानचा ५-१ असा, तर बांगलादेशचा ७-० असा धुव्वा उडवला होता.तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता. तर जपानसोबतचा सामना 2-2 ने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आशिया चषक हॉकीत भारताचा सलग तिसरा विजय, पाकिस्तानचा 3-1 ने धुव्वा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2017 07:22 PM (IST)
भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून आशिया चषक हॉकीत सलग तिसरा विजय साजरा केला. बांगलादेशातल्या ढाक्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -