Asia Cup 2022: गतविजेता भारतीय हॉकी संघ (India Hockey Team) आणि दक्षिण कोरिया  यांच्यातील सुपर 4 टप्प्यातील शेवटचा राऊंड 4-4 असा बरोबरीत सुटला. अंतिम फेरीच्या दृष्टीनं हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. यानंतर भारतीय संघ कांस्यपदासाठी जपानशी भिडणार आहे. दरम्यान, आशिया हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात कोरियाचा सामना मलेशियाशी खेळणार आहे. 


कोरियाविरुद्ध सामन्यात आठव्या मिनिटाला नीलम संजीपनं भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर कोरियानं दोन गोल केले. त्यानंतर 20व्या मिनिटाला मनिंदर सिंहनं गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. सेशे गौडाने अल्पावधीतच भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, कोरियाच्या किमनं 27 व्या मिनिटाला गोल करून पुन्हा बरोबरी साधली. तिसर्‍या क्वार्टरमध्ये मारिसवरन शक्तीवेलनं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जंग मांजेनं पुन्हा गोल करून बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही.






 


एफआयए क्रमवारीका जाहीर; भारतीय पुरुष हॉकी संघांची घसरण
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (International Hockey Federation) सोमवारी क्रमवारीका जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय पुरुष संघाची (Indian Men’s Hockey Team) एका स्थानानं घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तर महिला संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (2842.258) (Australia) आणि नेदरलँड (3049.495)  (Netherlands) संघ अव्वल स्थानावर आहेत.


हे देखील वाचा-