India vs Japan Live score : जपानचा भारतावर मोठा विजय, 5-2 ने दिली मात

IND vs JPN Asia Cup Hockey 2022 Live Streaming : हॉकी आशिया कपमध्ये सलामीच्या सामन्यात भारत पाकिस्तान सामना अनिर्णीत सुटल्यानंतर आज भारतीय संघ जपानशी दोन हात करणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 May 2022 06:47 PM
India vs Japan Hockey Live : अखेरच्या मिनिटांतही जपान सरस. भारताचा दारुण पराभव

अखेरच्या मिनिटांतही जपानने आणखी एक गोल केल्यामुळे भारताचा 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

India vs Japan Hockey Live : जपानचा चौथा गोल

जपानने आणखी एक गोल केल्यामुळे त्यांचा स्कोर 4 झाला असून भारत मात्र दोन गोलसह पिछाडीवर आहे.

India vs Japan Hockey Live : सामना चुरशीच्या स्थितीत

जपानने आणखी एक गोल केला असून भारतानेही एक गोल केल्याने सामन्यातील स्कोर 3-2 झाला आहे.

India vs Japan Hockey Live : भारताकडून पवनने केला गोल

पवन राजभरने भारताकडून अप्रतिम गोल करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.

India vs Japan Hockey Live : जपानचं दुसरं यश, 2-0 ची आघाडी

जपानने आणखी एक यश मिळवलं आहे. कावाबे कोसेने (Kawabe Kosei) गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली आहे.

India vs Japan Hockey Live : दुसऱ्या क्वॉर्टरनंतर स्कोर 1-0

सामन्यातील दुसरी क्वॉर्टर संपली असून जपानने एक गोल केल्यामुळे स्कोर 1-0 असा आहे.

India vs Japan Hockey Live : जपानचा गोल, 1-0 ची आघाडी

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये जपानच्या यामासाकी कोजीने बॉटम कॉर्नरमध्ये चेंडू ढकलत पहिला गोल केला आहे. 

India vs Japan Hockey Live : पहिल्या क्वॉर्टर अखेरीस स्कोर 0-0

सामन्यातील पहिली क्वॉर्टर संपली असून दोन्ही संघानी एकही गोल अद्याप केलेला नाही. त्यामुळे स्कोर 0-0 इतकाच आहे.

India vs Japan Hockey Live : सामन्याला सुरुवात, जपान आक्रमक

सामन्याला सुरुवात झाली असून सुरुवातीपासूनच जपानच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आहे.

India vs Japan Hockey Live : भारतीय वेळेनुसार 5 वाजता सुरु होणार सामना

भारत आणि जपान यांच्यातील आजची हॉकी मॅच भारतीय वेळेनुसार 5 वाजता सुरु होणार आहे. हा सामना इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या गेलोरा, बुंग कार्नो स्टेडियम कॉम्पलेक्समध्ये खेळवला जाणार आहे.


 

India vs Japan Hockey Live : भारताची आजची लढत जपानशी

इंडोनेशियात सुरु असलेल्या हिरो हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताचा सामना भारताशी असेल. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय थोडक्यात हुकल्यानंतर आज भारतासमोर जपान संघाचं आव्हान असणार आहे.

पार्श्वभूमी

India vs Japan Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघ सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या हिरो हॉकी आशिया कप स्पर्धा (Hero Asia Hockey Cup) खेळत आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय थोडक्यात हुकल्यानंतर आज भारतासमोर जपान संघाचं आव्हान असणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील सामन्यात भारताने विजय मिळवल्यास पुढील फेरीत जाण्यासाठी भारताला मदत होईल. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने तगडी टक्कर दिल्यामुळे भारताला आज दमदार कामगिरी करुन विजय मिळवणं गरजेचं आहे.


याआधी झालेली 2017 रोजीची आशिया कप स्पर्धा भारताने जिंकली होती. त्यामुळे यंदाही ही ट्रॉफी स्वत:कडे भारत ठेवू इच्छिणार असणार आहे. त्यात स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध अनिर्णीत सुटला. सामन्यात सुरुवातीला भारताकडून पहिला वहिला सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय कार्ती सेल्वमने (Karti Selvam) अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. सामना सुरु होताच काही वेळात सेल्वमने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने 1-0 ची आघाडी घेतली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये घेतेलेली ही आघाडी भारताने जवळपास अखेरपर्यंत कायम ठेवली. पण चौथ्या क्वॉर्टरमध्ये सामना संपण्याच्या जवळपास शेवटच्या मिनिटांला पाकिस्तानच्या अब्दुल राणाने (Abdul Rana) अप्रतिम गोल केला. पाकिस्तानला अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा अब्दुलने घेत संघाला बरोबरीत आणलं. दरम्यान आज भारत आज जपानविरुद्ध विजय मिळवणार का हे पाहावे लागेल. या स्पर्धेत यंदा दोन पूल असणार आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.