दुबई: आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान मैदानात कोसळलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर पडला आहे. या धक्क्यानंतर टीम इंडियाला आणखी धक्के बसले आहेत. पंड्यापाठोपाठ आणखी दोन खेळाडू दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतूनच बाहेर गेले आहेत. पालघरचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडावं लागलं. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघात रवींद्र जाडेजाचं पुनरागमन झालं आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल यांच्या जागीर दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश केला आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन याबाबतची माहिती दिली. हार्दिक पंड्याला काल गोलंदाजीदरम्यान कमरेच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे त्याला स्टेचरवरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं. तर शार्दूल ठाकूरच्या जांघेला दुखापत झाली आहे आणि अक्षर पटेलच्या अंगठ्याला जखम झाली आहे. दरम्यान, रवींद्र जाडेजा हा अनेक दिवसांनी भारताच्या वन डे संघात परतणार आहे. हार्दिकच्या जागी दीपक चहर? हार्दिक पंड्या संघातून बाहेर झाल्यानंतर, त्याच्या जागी ऑल-राऊंडर दीपक चहरची निवड झाली आहे. दीपक चहर आजच दुबईत जाणार आहे.
दीपक चहरने इंग्लंडमध्ये टी-20 सीरीजमधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यावेळी बुमराहच्या जागी चहरला टीममध्ये घेण्यात आले होते. हार्दिक पंड्या दुबईतील मैदानावरच कोसळला आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारत, विजयाची नोंद केली. मात्र या सामन्यादरम्यान भारताला धक्का देणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताचा ऑल-राऊंडर हार्दिक पंड्याच्या कंबरेला दुखापत झाली. हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं. पंड्याच्या जागी मनीष पांडे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. मनीष पांडेने येताच एक अफलातून झेल घेतला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचा हा झेल घेतला. संबंधित बातम्या  आशिया कप : दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर   Asia Cup - भारताचे चार खेळाडू, ज्यांनी एकहाती विजय मिळवला