मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराला आयपीएलमधून माघार घ्यावी लागणार आहे. मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे नेहरा आयपीएलमधून आऊट झाला आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. नेहराच्या या दुखापतीचं गांभीर्य लक्षात घेता त्याला किमान तीन ते सहा महिने विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.
आयपीएलच्या नवव्या मोसमात नेहराला दुखापतीमुळे विश्रांती घ्यावी लागण्याची ही दुसरी वेळ आहे. अलिकडच्या काळातल्या ट्वेन्टी 20 सामन्यांनी नेहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली होती.
पुढच्या दीड वर्षांत मात्र भारतीय संघ एकही ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळणार नसून, कसोटी क्रिकेट अधिक खेळणार आहे. त्यामुळे नेहराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.