मंत्रालयाच्या गेटवर 5 हजारांची लाच घेताना उपसचिव अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 19 May 2016 09:57 AM (IST)
मुंबई : गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकरला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पाच हजारांची लाच घेताना एसीबीने खेडेकरला अटक केली. पोलिस शिपायाची फाईल क्लिअर करण्यासाठी खेडेकरने दहा हजारांची मागणी केली होती. त्यापैकी पाच हजाराची लाच घेताना खेडेकरला सापळा रचून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या गेटवरच संजय खेडेकरला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं त्याला अटक केली. तक्रारदाराच्या मुलाची पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी फाईल क्लीअर करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.