मुंबई : 'बाप तसा बेटा' असं म्हणतात आणि त्यावर अर्जुन तेंडुलकरने शिक्कामोर्तब केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत, त्याचा मुलगा अर्जुनही आता वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.


 

अर्जुन तेंडुलकरची आंतर विभागीय स्पर्धेच्या 16 वर्षांखालील पश्चिम विभाग संघात निवड झाली आहे. हुबळीमध्ये आजपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे.

 

ओम भोसले हा या संघाचा कर्णधार असून 6 जून रोजी ही स्पर्धा संपणार आहे.

 

बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी स्नेहल परिख यांनी अंडर-16 वेस्ट झोन संघाची घोषणा केली.

 

राकेश परिख यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ज्युनिअर सिलेक्शन कमिटीची सोमवारी बैठक पार पडली. या समितीत प्रशिक्षक तुषार अरोठे, शंतनु सुगवेकर, समीर दिघे आणि जे कृष्ण राव यांचा याचा समावेश होता.

 


अंडर-16 वेस्ट झोन संघ : ओम भोसले (कर्णधार), वासुदेव पाटील, सुवेद पारकर, स्मित पटेल, संगप्रीत बग्गा, यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, नील जाधव (विकेटकीपर, अर्जुन तेंडुलकर, योगेश डोंगरे, अथर्व अंकोलेकर, सुरज सूर्याल, सिद्धार्थ देसाई, आकाश पांडे, मुकुंद सरदार.