पुणे : पुण्याच्या संतोष राऊत यांनी फेटे बांधण्याचा विश्वविक्रम केला आहे. संतोष राऊत यांनी एका तासात तब्बल 129 फेटे बांधून नवा विश्वविक्रम केला. याआधी पंजाबमध्ये एका तासात 35 फेटे बांधण्याच्या विक्रमाची नोंद होती.


 

अद्वैत कला क्रीडा मंचच्या वतीने आज फेटे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमात 45 महिला आणि 84 पुरुषांनी सहभाग नोंदवला होता.

 

महाराष्ट्रात फेटा बांधण्याची परंपरा जुनी आहे, मात्र तरीही  90% लोकांना फेटा बांधता येत नाही. याची जाणीव झाल्यानंतर मी फेटा बांधण्यास शिकलो. या विश्वविक्रमासाठी दररोज टीमसोबत तयारी करत होतो. अखेर आज विश्वविक्रम केल्याचं आनंद आहे. यापुढे ही असाच रेकॉर्ड करणार, अशी प्रतिक्रिया संतोष राऊत यांनी व्यक्त केली.

 

याआधी फेटे बांधण्याचा हा विश्वविक्रम पंजाबमध्ये केला होता. मात्र पुण्याच्या संतोष राऊत यांनी तब्बल 129 फेटे बांधून हा विक्रम मोडला. संतोष राऊत यांची कामगिरी अभिमानस्पद आहे, असं या उपक्रमाचे ज्युरी डॉ. अजय दुधाने म्हणाले.