मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11  वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.


 

कुठे पाहाल निकाल?


 

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

कसा पाहाल निकाल? 


 

बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाचे पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

 

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.