मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी 11 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या काहीच दिवसांनंतर विराट द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. याच दरम्यान, अनुष्काचे वडील रिटायर्ड कर्नल अजय शर्मा यांनी आपल्या जावयाला एक खास 'भेट' दिली आहे.

'मुंबई मिरर'च्या रिपोर्टनुसार, 3 फेब्रुवारीला अनुष्काचे आई-वडील मुंबईत तेजस्वीनी दिव्या नाईक यांच्या 'स्मोक अॅण्ड व्हिस्की' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजर होते. यावेळी अनुष्काच्या वडिलांना हे पुस्तक प्रचंड आवडलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ हे पुस्तक आपल्या जावयासाठी घेतलं. त्यांनी हे पुस्तक आपल्या जावयाला गिफ्ट दिलं आहे.

हे पुस्तक नात्यांवरील आधारित कवितांवर आहे. यामध्ये 42 कविता आहेत. याआधीही विराट आणि अनुष्काच्या लग्नावेळी पाहुण्यांनी सुफी कवी रुमीच्या कवितांचं पुस्तक त्यांना भेट दिलं होतं. विराट आणि अनुष्का दोघांनाही कविता वाचणं फार आवडतं.

इटलीमध्ये लग्नसोहळा आटोपल्यानंतर विराट आणि अनुष्काने दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी दिली होती.