लीड्सच्या मैदानावर शनिवारी भारताने अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर सात धावांनी मात केली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने चौकार लगावताच खुश झालेल्या अनुष्काने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मात्र टाळ्यांऐवजी चौकाराची खूण करायला हवी, असं अनुष्काच्या ध्यानात आलं. मात्र 'फोर' मारल्यावर नेमकी काय खूण करतात, हे न सुचल्यामुळे तिने शेजारी बसलेल्या मित्राला 'फोरचा सिग्नल काय असतो?' अशी विचारणा केली.
अनुष्काने मित्राला विचारताना केलेली लिप मूमेंट कॅमेऱ्यात कैद झाली. साहजिकच कोट्यवधी प्रेक्षकांनी तिने काय प्रश्न विचारला, याचा अचूक आराखडा बांधला. त्यावरुन सोशल मीडियावर अनुष्काचं यथेच्छ ट्रोलिंग सुरु झालं. कोणी 'ही बघा भारतीय कर्णधाराची बायको' अशी तिची अवहेलना केली, तर कोणी 'ही फक्त फ्लाईंग किसच बघायला येते वाटतं' असं म्हणत तिची टर उडवली.
ट्रोलिंगला सामोरं जाण्याची अनुष्काची ही पहिलीच वेळ नाही. विराट आणि अनुष्का यांनी आपल्या नात्याची जाहीर वाच्यता करण्याअगोदरही ती सामने पाहण्यासाठी स्टेडिअमवर जात असे. त्यावेळी जेव्हा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, तेव्हा अनुष्कावर त्याचं खापर फोडलं जात असे. यावरुन संतापलेल्या विराटने एकदा ट्रोलर्सची शाळा घेऊन काहीही संबंध नसलेल्या अनुष्कावर टीका न करण्याचा इशाराही दिला होता.
अनुष्काबाबत ट्विटरवरील काही प्रतिक्रिया