'माझा कट्टा'वर संदीप पाटील यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंह धोनीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला होता.
निवृत्ती घेतली नसती तर सचिनला संघाबाहेर बसवणार होतो : संदीप पाटील
सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघाबाहेर बसवण्याचा विचार होता. तसंच 2015 च्या वर्ल्डकपआधी धोनीला कर्णधारपदावरुन हटवण्याचा विचार होता, असं संदीप पाटील यांनी म्हटलं होतं.
मात्र यानंतर अनुराग ठाकूर यांनी संदीप पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, "संदीप पाटील यांनी गोपनीयतेचं उल्लंघन केलं. निवड समितीचे माजी अध्यक्ष असल्याने संदीप पाटील यांनी अशी टिप्पणी करायला नको होती. अध्यक्ष असताना ते या प्रश्नांचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देत असत. पण कार्यकाळ संपल्यानतंर त्यांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं. संदीप पाटील यांनी केलेले खुलासे अनैतिक आहेत. भविष्यात त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल."
धोनी आणि टीम इंडिया.. संदीप पाटील यांचे गौप्यस्फोट
दरम्यान, संदीप पाटील यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही. पण बोर्ड यासंदर्भात पाटील यांच्याशी चर्चा नक्कीच करणार असल्याचं ठाकूर म्हणाले.
काय म्हणाले पाटील?
कट्टा : संपूर्ण व्हिडीओ