केंद्रीय संरक्षणमंत्री राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी होणार आहेत.
धुळ्यातील गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन महानगरपालिकामार्गे शिवतीर्थ चौक असा मोर्चाचा मार्ग आहे. शिवतीर्थ चौक इथेच मोर्चाचा समारोप होईल. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
तीन हजार स्वयंसेवक ज्यात दोन हजार पुरुष आणि एक हजार महिला, 25 गट प्रमुख, 11 विभाग प्रमुख, एसआरपीएफ प्लाटूनसह अतिरिक्त पोलिस तैनात मोर्चासाठी तैनात असतील.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सर्व शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. एसटी बसही धुळे शहराच्या बाहेरुन वळवण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरात चारही बाजूने येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील.