प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट चांगला होऊ शकला असता, विराट कोहलीसोबतच्या वादावर अनिल कुंबळेचं वक्तव्य

एबीपी माझा वेब टीम Updated at: 22 Jul 2020 08:28 PM (IST)

चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.

NEXT PREV

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार फिरकीपटू अनिल कुंबळेने विराट कोहलीसोबतच्या मदभेदावर टीप्पणी केली आहे. अनिल कुंबळेला 2016 साली टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र 2017 मध्ये विराट कोहली सोबतच्या मतभेदांनंतर मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रवासाबद्दल बोलताना अनिल कुंबळेने म्हटलं की, माझ्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाच शेवट चांगला होऊ शकला असता.


विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या मतभेद असल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या. मात्र चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान विराट कोहलीला याबाबत विचारलं असता त्याने या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं. चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.


अनिल कुंबळेने म्हटलं की



निवृत्तीनंतर पुन्हा ड्रेसिंग रुमचा भाग होण्याच अनुभव चांगला होता. मला कोणत्याही गोष्टींचा पश्चाताप नाही. मात्र माझ्या प्रशिक्षक कार्यकाळाचा शेवट चांगला होऊ शकला असता. मी खूप आनंदी होतो की मी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. मी टीम इंडिया सोबत एक वर्ष घालवलं, तो अनुभव शानदार होता. भारतीय खेळाडूंसोबत खेळणे आणि निवृत्तीनंतरही ड्रेसिंग रुमचा भाग होणे, हा सुखद अनुभव होता.-


पुढे अनिल कुंबळे म्हणाला की



टीम इंडियाची त्यावर्षीची कामगिरी उत्तम होती. मी आनंदी होतो की माझं त्यात काही योगदान होतं आणि मला कोणताही पश्चाताप नाही. मी त्यापुढे गेलो असून आनंदी आहे. मला जाणिव आहे की याचा शेवट चांगला होऊ शकला असता, मात्र ठीक आहे.-


अनिल कुंबळेने भारताकडून 132 कसोटी आणि 271 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 619 आणि एकदिवसीय सामन्यात 337 विकेट कुंबळेच्या नावे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावे आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.