ब्रिटनच्या अँडी मरेनं नोवाक जोकोविचचा 6-3, 6-4 असा दोन सेट्समध्ये धुव्वा उडवून, एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद पहिल्यांदाच पटकावण्याचा पराक्रम गाजवला आहे.

या कामगिरीसह अँडी मरेनं 2016 या कॅलेंडर वर्षात एटीपी क्रमवारीतला आपला नंबर वन कायम राहिल याचीही खबरदारी घेतली. लंडनच्या ओ टू एरिनात एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचं आयोजन करण्यात आलं होतं.

नोवाक जोकोविचनं आजवरच्या कारकीर्दीत पाचवेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचं यंदा सहावं विजेतेपद पटकावून रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण अँडी मरेनं एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद पटकावून जोकोविचच्या त्या मनसुब्यावर पाणी फेरलं.